वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे! ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

नवी मुंबई : प्रेमाचा उत्सव म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधून वाशी येथील इनऑर्बिट मॉल सज्ज झाला आहे. केवळ खरेदीचे केंद्र न राहता, आठवणींचे दालन उघडण्याच्या उद्देशाने मॉलने ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान विविध नाविन्यपूर्ण आणि संवादात्मक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांची सुरुवात रोज दुपारी ४:३० वाजल्यापासून होणार असून, जोडप्यांसह मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबांसाठी हे खास आकर्षण ठरणार आहे.

उत्सवाची सुरुवात ११ फेब्रुवारीला ‘प्रॉमिस डे’ निमित्त ‘वॅक्स हँड एंगेजमेंट’ उपक्रमाने होणार आहे. या उपक्रमात सहभागी जोडपी व मित्रपरिवार हाताचा मेणाचा साचा तयार करून नात्यातील बांधिलकी आणि एकोप्याचे प्रतीक म्हणून स्मरणचिन्ह जतन करू शकतील. १२ फेब्रुवारीला जुन्या आठवणींना उजाळा देणारा ‘विंटेज टाइप्ड लेटर्स’ अनुभव देण्यात येणार असून, अभ्यागतांना टायपरायटरवर मनोगत व्यक्त करत वैयक्तिक, कालातीत पत्र लिहिण्याची संधी मिळेल.

१३ फेब्रुवारीला ‘किस डे’ निमित्त ‘लिप बाम मेकिंग’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या डीवायपी उपक्रमातून सहभागी स्वतःचा लिप बाम तयार करत सेल्फ-केअरचा गोड अनुभव घेऊ शकतील. व्हॅलेंटाइन डे अर्थात १४ फेब्रुवारीला ‘पिझ्झा मेकिंग विथ युवर व्हॅलेंटाइन’ हा विशेष उपक्रम एसबारोच्या सहकार्याने होणार असून, जोडप्यांना एकत्र पिझ्झा बनवण्याचा आनंददायी अनुभव देण्यात येईल.

उत्सवाची रंगत वाढवण्यासाठी मिनिसो, द बॉडी शॉप, रुबान्स आणि बेवकूफ यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सना व्हॅलेंटाइन सेट-अपमध्ये पॉप-अप स्टोअर्ससाठी जागा देण्यात आली आहे. खरेदीसोबतच अनुभवाधारित उपक्रमांची ही मेजवानी अभ्यागतांमध्ये संवाद, आनंद आणि आठवणी निर्माण करण्यावर भर देत असल्याचे मॉल व्यवस्थापनाने सांगितले.

या उपक्रमांमुळे इनऑर्बिट मॉल वाशी केवळ खरेदीचे केंद्र न राहता, नात्यांना जवळ आणणारे आणि उत्सवाला अनुभवांची जोड देणारे ठिकाण म्हणून स्वतःची ओळख अधिक बळकट करत आहे.

  • Related Posts

    विस्मरणात गेलेल्या वारशाला नवे प्राण: हरि चंदना आयएएस यांची दृष्टी

    हैदराबाद (तेलंगाना), फरवरी 11: हैदराबादच्या ऐतिहासिक उस्मानिया विद्यापीठ परिसरात वसलेली एक काळाच्या पडद्याआड गेलेली अमूल्य ठेवा — महालका बाई पायविहीर — आज अनेक दशकांच्या दुर्लक्षानंतर नव्याने उजळून निघाली आहे. कधीकाळी…

    केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : सीए अभय भुतडा यांनी महत्त्वाच्या आर्थिक प्राधान्यांबद्दल व्यक्त केली प्रतिक्रिया

    अभय भुतडा यांनी या अर्थसंकल्पातील प्राधान्यांबाबत आपली मते व्यक्त केली. मुंबई (महाराष्ट्र), फरवरी 03 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ सादर केल्यानंतर, उद्योजक आणि समाजसेवक तसेच अभय भुतडा…

    You Missed

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे! ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    वाशीतील ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये घुमणार प्रेमाचे वारे!  ‘व्हॅलेंटाईन वीक’निमित्त खास उपक्रमांची मेजवानी

    विस्मरणात गेलेल्या वारशाला नवे प्राण: हरि चंदना आयएएस यांची दृष्टी

    केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : सीए अभय भुतडा यांनी महत्त्वाच्या आर्थिक प्राधान्यांबद्दल व्यक्त केली प्रतिक्रिया

    केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : सीए अभय भुतडा यांनी महत्त्वाच्या आर्थिक प्राधान्यांबद्दल व्यक्त केली प्रतिक्रिया

    संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा २५ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

    लोकशाही संघटनेचा ‘आयकॉनिक चेंज मेकर अवॉर्ड 2025’ आयएएस अधिकारी हरि चंदना यांना प्रदान

    भारतामधील बिझनेस कंटिन्युइटी प्लॅनिंग: आउटेज, सायबर हल्ले आणि डाऊनटाइममधून घेतलेले धडे

    भारतामधील बिझनेस कंटिन्युइटी प्लॅनिंग: आउटेज, सायबर हल्ले आणि डाऊनटाइममधून घेतलेले धडे